ज्ञानमेव जयते - Knowledge Alone Triumphs
कुपवाडचे स्व. स्वातंत्र्यसैनिक आण्णा पारिसा गौंडाजे यांच्या आदर्श विचारसरणीनुसार, प्रेरक जीवनगाथेतून समाज उत्थानासाठी दिनांक 28 मार्च 2010 रोजी स्नेहजित प्रतिष्ठान, या महाराष्ट्रातील एक नावाजलेल्या संस्थची स्थापना करण्यात आली.
समाजातील गरजू घटकांसाठी स्वच्छेने काम करण्यासाठी या अशासकीय, अराजकीय नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
शिक्षण, सांस्कृतिक, कृषी, आरोग्य, क्रीडा तसेच पर्यावरण अशा सर्वच आघाड्यांवर काम करण्याचे ध्येय भागातील एक नामवंत, विधायक, उपक्रमशील बहुउद्देशीय संस्था म्हणून या संस्थेचा लौकिक आहे. घंटा हे आमचे प्रतीक ज्ञान प्राप्त करण्याच्या उत्साहाचे प्रतीक आहे, सामाजिक चळवळीची सुरुवात करताना जागरूकता हवी यासाठीच हे प्रतिक निवडले आहे. आमचे ब्रीदवाक्य 'ज्ञानमेव जयते' म्हणजे 'ज्ञानाचाच विजय'. असे सुचविते.
समाजजागृतीची चळवळ निर्माण करताना घंटानाद करून ज्ञान मिळवण्यासाठी सज्ज व्हा, कारण ज्ञान हेच सर्व सुखाचे कारण बनते, असे प्रतिष्ठानचे बोधचिन्ह सुचवते. ज्ञानाचाच अंतिम विजय असतो, असे सांगणारे ज्ञानमेव जयते हे ब्रीदवाक्यही याचेच प्रतीक आहे. ज्ञानाची माहिती सांगणारे बोधचिन्ह स्नेहाने जितेपद मिळवणाऱ्या प्रतिष्ठानच्या कार्याची दिशा दर्शविते. या दिशेनेच मागील 15 वर्षे प्रतिष्ठानने भरीव सामाजिक कार्य केले आहे.
घंटा हे आमचे प्रतीक - ज्ञान प्राप्त करण्याच्या उत्साहाचे प्रतीक
Download our official certificates and registrations
Tax exemption certificate under section 80G of Income Tax Act
Form 10AC (80G)Valid from AY 2027-28 to AY 2031-32
Registration certificate under section 12A of Income Tax Act
Form 10AC (12A) : Valid from AY 2027-28to AY 2036-37
Corporate Social Responsibility registration certificate
CSR Registration No: CSR00020439
Permanent Account Number of the organization
PAN Number: AALTS9944C
Niti Aayog Certificate: MH/2021/0298695
"शिक्षण, सेवा व संस्कार यांच्या माध्यमातून समताधिष्ठित, सक्षम, सुसंस्कृत व स्वावलंबी समाजनिर्मिती करणे."
"समाजासाठी काहीतरी करण्याची भावना हीच आमची प्रेरणा आहे. आपल्या सहकार्याने अधिक मोठा बदल घडवू शकतो."
Founder President, Snehajeet Pratishthan
अध्यक्ष
उपाध्यक्ष
सचिव
सदस्य