Menu

Our Projects

Making a difference through dedicated initiatives

Agriculture Training

सन्मती कृषी कौशल्य व प्रशिक्षण केंद्र

ग्रामीण युवक व महिलांना आधुनिक शेती, पूरक व्यवसाय आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण.

Future Plan:

Establish a permanent training center with modern farming equipment and demonstration farms.

Support This Project
Women Empowerment

महिला उद्योजकता विकास

महिलांना व्यवसाय प्रशिक्षण व आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन.

Future Plan:

Expand to 10 new villages and establish a women's product marketing platform.

Support This Project
Theatre Development

तमाशासम्राट कै.बाबुराव कुपवाडकर नाट्यगृह विकास प्रकल्प

कुपवाड मधील तमाशासम्राट कै. बाबुराव कुपवाडकर नाट्यगृह मनपासोबत जॉइंट व्हेंचर तत्वानुसार विकसित करण्याचा प्रकल्प सुरु आहे. तमाशासम्राट कै. बाबूराव कुपवाडकर खुले नाट्यगृहाच्या नामफलकाचे अनावरण ऑक्टोबर 2011 मध्ये मा. दत्तात्रय मेतके, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड मनपा यांच्या हस्ते झाले. जॉइंट व्हेंचर तत्त्वाने या नाट्यगृहाची देखभालीची जबाबदारी स्नेहजित प्रतिष्ठान या आमच्या संस्थेकडे देण्यात आलेली आहे. या नाट्यगृह आवारात नाट्य कार्यशाळा, तमाशासम्राट कै. बाबुराव कुपवाडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन, कलामहोत्सव, बाल दिनानिमित्त बालचित्रपट महोत्सव, रंगभूमी दिनानिमित्त कलाकारांना प्रोत्साहन व कलाकारांचा सत्कार अशा सांस्कृतिक उपक्रमांचे सतत आयोजन केले जात आहे. कुपवाड परिसरातील शाळांना त्यांच्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध करून दिले जात आहे.

या नाट्यगृहांमध्ये खालील सुविधा निर्माण करण्याचे नियोजन सुरु आहेत. बांधीव उत्तम स्टेज, सुमारे दोनशे व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था, बंदिस्त शेड, वीज, पाणी व स्वच्छतागृहाची सोय, व पार्किंगची चांगली सुविधा लोक कलावारसा संवर्धन उपक्रम, स्थानिक इतिहास व संस्कृती जपण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

Future Plan:

Complete construction of closed shed, parking, and modern amenities.

Support This Project
Literature Festival

शब्दरत्न साहित्य संमेलन

शब्दरत्न साहित्य संमेलनाचा उपक्रम स्नेहजित प्रतिष्ठानने काही वर्षांपूर्वी सुरू केला. साहित्य विषयक आवड विद्यार्थ्यांना लागावी व स्थानिक साहित्यिकांचे साहित्य घराघरात पोहोचावे, विशेषता मराठी भाषिक साहित्य लोकांना उपयुक्त ठरावे यासाठी शब्दरत्न या नावाने साहित्य संमेलन सुरू करण्यात आले.

पहिल्या वर्षी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते वसंत केशव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड येथे यशवंत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने संमेलन घेण्यात आले. बामणोली ( तालुका मिरज) या कोयना पुनर्वसित गावामध्ये दुसरे साहित्य दुसरे शब्दरत्न साहित्य संमेलन घेण्यात आले. डॉ. व्यंकटेश जंबगी यांच्या अध्यक्षतेखाली व बाल संमेलनाध्यक्षा दीक्षा लोहार यांच्या अध्यक्षतेखाली हे शब्दरत्न साहित्य संमेलन झाले. बामणोली ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा यांच्या सहकार्याने हे संमेलन उत्कृष्टपणे पार पडले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी बालवाचन कट्टा उपक्रम राबविला जात असून महाराष्ट्र शासनाने यासाठी धर्मादाय निधीतून मदतही केली आहे.

Future Plan:

Establish permanent library and reading rooms in rural schools.

Support This Project
Senior Citizens

तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघ

कुपवाड परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहजित प्रतिष्ठान संचलित तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विविध कार्य सुरू आहे. त्यांच्या अडचणी सोडवणे, मदत करणे, कायदेशीर सल्ला देणे, आरोग्य तपासणी, वाढदिवसानिमित्त सत्कार असे अनेक उपक्रम राबवले जातात. ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण सन्मान, आरोग्य मार्गदर्शन असे उपक्रम सातत्याने राबविले जातात. कुपवाड पोलीस ठाण्यामार्फत संघाच्या सदस्याकरिता खेळ साहित्य भेट देऊन संवाद सुरु ठेवला आहे.

Future Plan:

Establish a dedicated senior citizen recreation and care center.

Support This Project
NGO Connect

NGO Connect & Training Center

एनजीओ कनेक्ट हा उपक्रम विविध रोटरी क्लब व संस्थाच्या साह्याने स्नेहजित प्रतिष्ठान मागील दहा वर्षे राबवित आहे. या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील नोंदणीकृत अशासकीय स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यामध्ये सातत्याने सहभागी आहेत अशा व्यक्ती यांचे संघटन करण्याचा प्रयत्न सुरू आहे या उपक्रमांतर्गतच स्नेहसेवा ही ई पुस्तिका सांगली जेलफोड चळवळीच्या स्मृतीदिनी 24 जुलै 2021 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. यात सुमारे दोनशेहून अधिक सामाजिक संस्थांची माहिती देण्यात आलेली आहे. तिची उपयुक्तता सर्वांसाठीच महत्त्वाची ठरलेली आहे. या बरोबरच मिरजेतील संवाद फोरमच्या वतीनेही सेवाभावी संस्था सक्षमीकरण सुरु असून स्नेहजित प्रतिष्ठानचा त्यात पुढाकार आहे.यापुढील काळात कायमस्वरूपी ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून एनजीओ सक्षमीकरण व मार्गदर्शन उपक्रम राबविला जाणार आहे.

Future Plan:

Establish a permanent training center for NGO capacity building.

Support This Project
Freedom Fighters

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघ

कुपवाड शहर हे पूर्वी ब्रिटिश हद्दीतील गाव होते. या गावात सुमारे एकवीस स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात.

🎂 स्वातंत्र्यसैनिकांचे वाढदिवस 🕯️ स्मृतिदिनी समारंभ 📜 उत्तराधिकारी हक्क संवर्धन 🏛️ कोनशिला बसविण्याची मागणी

Future Plan:

स्वातंत्र्यसैनिकांच्या उत्तराधिकारी यांना एकत्र आणून त्यांचे अधिकार मिळवून देणे व महापालिका कार्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाची कोनशिला बसविणे.

Know More
Snehajeet Prakashan

स्नेहजित प्रकाशन

स्नेहजित प्रतिष्ठानची संपर्क माध्यम यंत्रणा. व्यावसायिक प्रकाशन संस्थेद्वारे विविध पुस्तके, दिनदर्शिका आणि साहित्य प्रकाशित.

📖 कुपवाड टेलिफोन डिरेक्टरी 📚 स्मृतिगंध 📖 स्मृतीकलश 🇮🇳 क्रांतीतीर्थ अंदमान 🙏 प्रार्थना 📘 रीच क्लास मॉनिटर 📝 कविता वैष्णवीच्या 🗓️ स्नेहजित दिनदर्शिका

Future Plan:

अधिकाधिक साहित्य प्रकाशन व ऐतिहासिक दस्तऐवजीकरण. कुपवाड विशेष स्तंभासह दिनदर्शिकेचा प्रसार.

Know More